४ वर्षांनी उजनी जाणार ४० टक्क्यापर्यंत मायनस; धरणाने तळ गाठला, सोलापूरसाठी ५ मेला पाणी सुटणार

सोलापूर, पुणे, नगर या तीन जिल्ह्यांसाठी आणि धाराशिव शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेले उजनी धरण मे महिन्याच्या सुरवातीलाच गाठत आहे. सोलापूर शहरासाठी ५ मे रोजी भीमा नदीतून पाणी सोडले जाणार आहे.
ujani dam
ujani damsakal

सोलापूर : सोलापूर, पुणे, नगर या तीन जिल्ह्यांसाठी आणि धाराशिव शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेले उजनी धरण मे महिन्याच्या सुरवातीलाच गाठत आहे. सोलापूर शहरासाठी ५ मे रोजी भीमा नदीतून पाणी सोडले जाणार आहे. सध्या कॅनॉल, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वी (१५ जूनपर्यंत) धरण मायनस ४० टक्क्यांपर्यंत खाली जाईल, अशी स्थिती आहे.

सध्या उजनीतून सीना-माढा (३३३ क्युसेक), दहिगाव उपसा सिंचन योजनेतून (१०० क्युसेक) पाणी सोडले जात आहे. पुढील चार-पाच दिवसात ते पाणी बंद होईल. कॅनॉलमधून तीन हजार क्युसेकने पाणी सोडले जात असून १५ मेपर्यंत ते सुरु राहील. उपसा सिंचन योजना व कॅनॉलमधून पाणी सोडणे बंद होत असतानाच आता सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले जाणार आहे. महापालिकेने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाला त्यासंबंधीचे पत्र शुक्रवारी (ता. २८) पाठवले आहे. उजनी ते औज हे साधारणत: २०० किलोमीटर अंतर पार करायला आठ ते नऊ दिवस लागतात. सध्या सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात १० मेपर्यंत पुरेल इतकेच पाणी आहे. त्यामुळे १० मे रोजी औजमध्ये पाणी पोचेल, असे नियोजन करून उजनीतून पाणी सोडले जाणार आहे.

धरणासंदर्भात ठळक बाबी...

  • - २०२२ मध्ये १२ जूनपर्यंत धरण प्लसमध्येच होते.

  • - दरवर्षी सरासरी २० ते २२ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा खाली जातो.

  • - २०१८-१९ मध्ये मायनस ५९ टक्क्यांपर्यंत गेले होते.

  • - यंदा धरण पावसाळ्यापर्यंत (१५ जूनपर्यंत) मायनस ४० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता.

  • - पावसाळा लांबल्यावर मात्र ५० टक्क्यांपर्यंत धरण मायनसमध्ये जाणार.

आता कॅनॉलमधून शेतीसाठी पाणी नाहीच

धरण मायनसमध्ये गेल्यावर कॅनॉलमधून पाणी सोडणे बंद होणार आहे. बोगदा व उपसा सिंचन योजनेतूनही पाणी सोडता येत नाही. सोलापूर शहरासाठी एकदा पाणी सोडले की पुन्हा सोडणे कठीण असणार आहे. पण, अत्यावश्यक परिस्थितीत शहरासाठी आणखी एकदा जूनमध्ये पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com