
पुणे : सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र, प्रत्यक्षात असलेले क्षेत्र, गाव नकाशे आणि रेकॉर्डवरील क्षेत्र यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे राज्यातील जमिनीची पुनर्मोजणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी अस्तित्वात असलेल्या तुकडाबंदी- तुकडेजोड कायदा रद्द करावा, अशी महत्त्वपूर्ण शिफारस माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट समितीने राज्य सरकारला केली आहे. शासनाने त्यास मंजुरी दिल्यास त्याचा राज्यातील नागरिकांना मोठा फायदा होईल.