Fri, July 1, 2022

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन डबल मर्डर प्रकरणातून निर्दोष मुक्त
Published on : 25 April 2022, 12:27 pm
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची डबल मर्डर प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. छोटा राजनचे वकील ॲड. तुषार खंदारे यांनी याची माहिती दिली. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचा हा निकाल दिला. (Underworld don Chhota Rajan acquitted of double murder case)
२९ जुलै २००९ रोजी छोटा शकील गँगचे गुंड असिफ दाढी आणि शकील मोडक या दोघांची जे जे सिग्नलजवळ हत्या करण्यात आली होती. छोटा राजन याच्या गुंडांनी हे हत्याकांड घडवल्याचा आरोप करण्यात आला होता. या हत्याकांडात छोटा राजनलाही आरोपी करण्यात आले होते. मात्र, पुराव्यांअभावी सोमवारी विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायधीश अरविंद वानखेडे यांनी छोटा राजनला डबल मर्डरच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले.
Web Title: Underworld Don Chhota Rajan Acquitted Of Double Murder Case
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..