esakal | नितीन गडकरी अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये बैठक, काय होणार चर्चा?
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray-nitin gadkari

नितीन गडकरी अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये बैठक, काय होणार चर्चा?

sakal_logo
By
रामनाथ दवणे

मुंबई : सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin gadkari) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav thackeray) यांच्यात बैठक होणार आहे. पाच वाजता ही बैठक होणार असून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये काय चर्चा होणार? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हेही वाचा: अनिल देशमुखांच्या मुलासह सुनेला होणार अटक? CBI ची वारंटसह छापेमारी

गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहिले होते. त्यामधून शिवसैनिक राज्याच्या विकासासाठी सुरू असलेल्या रस्त्यांच्या बांधकामामध्ये अडथळा आणत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या पत्राची दखल घेतली होती. तसेच अनेकदा विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी एकत्र आल्यानंतर ठाकरे आणि गडकरी दोन्ही नेते एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. तसेच सध्या नितीन गडकरी यांनी राज्याच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले असून अनेक ठिकाणी भूमिपूजनाचा धडाका सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात देखील एका पुलाचे भूमिपूजन पार पडले. त्यावेळी त्यांनी पुण्यासाठी अनेक घोषणा केल्यात. तसेच अहमदनगर एका कार्यक्रमात शरद पवार आणि गडकरी एकाच मंचावर एकत्र आले होते. यावेळी गडकरींनी उत्तर महाराष्ट्रासाठी विकासकामे करणार असल्याचे म्हटले होते. आता महाराष्ट्राच्या विकासकामांबाबतच ही बैठक होणार आहे, की काही राजकीय चर्चांसाठी ही बैठक होत आहे का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

loading image
go to top