नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी; दाऊदच्या नावे दोन फोन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari
नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी; दाऊदच्या नावे तीन फोन

नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी; दाऊदच्या नावे दोन फोन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावाने धमकीचे तीन फोन आले आहेत. त्यामुळे आता गडकरींच्या नागपुरातल्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

नितीन गडकरी यांच्या नागपुरातल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये हे फोन आले आहेत. सकाळपासून तीन फोन येऊन गेले आहेत. यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं नाव घेण्यात आलं आहे. त्यामुळे आता नागपूर कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

सकाळी ११.३० वाजता एक आणि ११.४० ला एक असे दोन फोन नितीन गडकरींच्या नागपुरातल्या कार्यालयात आले होते. जिथे ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.