esakal | रावसाहेब दानवेंची मुख्यमंत्र्यांसमोर तुफान फटकेबाजी! सांगितला धमाल किस्सा..
sakal

बोलून बातमी शोधा

raosaheb danve

औरंगाबाद : दानवेंची मुख्यमंत्र्यांसमोर तुफान फटकेबाजी!

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

Marathwada Liberation Day 2021 in Maharashtra : मराठवाड्यात आज शुक्रवारी (ता.१७) सर्वत्र मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जात आहे. या निमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे. आज दिवसभर औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात महत्त्वाच्या घडामोडींना वेग येईल असे दिसते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसमोर (CM Uddhav Thackeray) यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी तुफान फटकेबाजी केली. यावेळी एक धमाल किस्सा रावसाहेब दानवे यांनी सांगितला. त्यावर मुख्यमंत्र्यांसह उपस्थितांमध्ये हशा पिकला.

एवढा लहान सभापती असतो का? दानवेंनी सांगितला धमाल किस्सा

जेव्हा मी जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. त्यावेळी मी नांगराच्या चिन्हावर निवडून आलो होतो. मला तेव्हा 65 रुपयांचा भत्त्याचा चेक मिळाला. मला चेक देताना मॅनेजर चेक देईना. ते मला ओळखेना, कारण मी सभापती असेन असं त्यांना वाटत नव्हतं, बँक अधिकाऱ्याने मला ओळखलं नाही. एवढा लहान सभापती असतो का?, असं बँक अधिकारी म्हणाले. शेवटी माझी ओळख करुन द्यावी लागली, असा किस्सा सांगताच मुख्यमंत्र्यांसह उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ पाहायला मिळाला.

मुख्यमंत्र्यांसमोर सत्तारांना टोला

सोलापूरपासून-धुळ्यापर्यंत रेल्वे झाली नाहीतर रावसाहेब दानवे यांना मतदान करून नका असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. मग मी पण म्हणालो सिलोड जिल्हा झाला नाही तर अब्दुल सत्तार यांना मतदान करू नका, अशी फटकेबाजीही दानवेंनी मुख्यमंत्र्यांसमोर केली.शालेय जीवनातच मी माझ्या राजकारणाची सुरुवात केली, असं सांगताना आता मंचावर बसलेले कुणीही त्याकाळी राजकारणात नव्हते, असं सांगायला दानवे विसरले नाहीत. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते.

loading image
go to top