Maharashtra Politics : सत्तेत एकत्र मात्र औरंगाबादमध्ये विरोध; शिंदे गट विरुध्द भाजप आमनेसामने United in power but opposition in Aurangabad but in sillod Shinde group vs BJP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics

Maharashtra Politics : सत्तेत एकत्र मात्र औरंगाबादमध्ये विरोध; शिंदे गट विरुध्द भाजप आमनेसामने

शिंदे गट आणि भाजप राज्यात सत्तेत एकत्र असतानाही त्यांच्यात कुरबुरी सुरू असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहे. पहिल्यांदाच हे दोन्ही पक्ष जाहीरपणे आमने-सामने आल्याचे दिसून येत आहे. त्याच कारण म्हणजे सिल्लोडमध्ये भाजपकडून शिंदे गटविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड नगरपरिषदेच्या विरोधात आज भाजपकडून आंदोलन करण्यात आलं आहे. दरम्यान ही नगरपरिषद गेल्या तीस वर्षांपासून शिंदे गटाचे नेते आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे या आंदोलनाच्या निमित्ताने शिंदे गट विरुद्ध भाजप मैदानात दिसून येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड नगर परिषदेच्या करवाढ विरोधात आज भाजपच्यावतीने डफडे वाजवा आंदोलन करण्यात येणार आहे. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची तीस वर्षांपासून एक हाती सत्ता असणाऱ्या नगर परिषदेच्या विरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी करवाढीच्या मुद्यावर आंदोलन सुरू केले आहे.

सिल्लोड नगरपरिषदेच्या मार्फत मागील काही दिवसांपूर्वी शहरातील मालमत्ता करवाढीचा वाढ नियमबाह्य पद्धतीने आकारल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. यामुळे भाजपच्यावतीने यापूर्वी उपोषणही केले होते. या करवाढीला तीव्र विरोध करण्यासाठीच आज भाजपकडून आंदोलन करण्यात येत येत आहे.