अनलॉक 4 : राज्यात आंतरजिल्हा प्रवासासाठी 'ई-पास' सक्ती रद्द; जाणून घ्या इतर सर्व नियमावली

तुषार सोनवणे
Monday, 31 August 2020

राज्यात केंद्राच्या नियमावलीच्या पार्श्वभूमीवर नियमावली जारी करण्यात येते का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे.

मुंबई - राज्यात अनलॉक 4 संदर्भातील नियमावली जारी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी अनलॉक 4 ची नियमावली जारी केली होती. त्यानंतर राज्यात केंद्राच्या नियमावलीच्या पार्श्वभूमीवर नियमावली जारी करण्यात येते का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे. त्यात सर्वात मोठी बाब मध्ये नागरिकांना आता आंतरजिल्हा प्रवासासाठी ईपास बंधनकारक नसणार आहे.

ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा; विद्यार्थ्यांची घरातूनच परीक्षा? : परीक्षेचा निर्णय उद्या 

राज्य सरकराने अनलॉक 4 ची नियमावली जारी केल्या त्यात ईपास शिवाय राज्यात आंतर जिल्हा प्रवास करता येणार असे नमूद केले आहे. गेल्या अनेक दिवासांपासून ईपास च्या जिकरी मुळे नागरिकांकडून राज्य सरकारवर मोठी टीका पाहायला मिळत होती. कोकणातल्या गणेशोत्सवासाठी अनेकांना ईपास मुले जाता आलेले नाही. राज्यत बाहेरून येणाऱ्यांना ईपासची विचारणा होत नसताना राज्यातील नागरिकांना ईपास सक्ती का असे अनेक प्रश्न नागरिक विचारित होते. 1 सप्टेंबर पासून राज्यात अनलॉक 4 ची प्रक्रिया सुरू होणार आहे, 

पालघर साधू हत्या प्रकरणी, ठाकरे सरकारची मोठी कारवाई; 17 पोलिस अधिकाऱ्यांना दणका

अनलॉक 4 च्या नियमावलीनुसार खासगी तसेच मिनी बसेसला परवानगी  देण्यात आली आहे. तसेच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज 200 उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी हा आकडा 100 उड्डाणे इतकाच होता. राज्य सरकाच्या अंतर्गत येणाऱ्या कार्यालयांमध्ये एमएमआर परिसर वगळता 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु एम एम आर परिसरात 30 टक्केच शासकीय कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यास मुभा असणार आहे. 

अनलॉक 4च्या नियमावली नुसार हॉटेल आणि लॉज 100 टक्के सुरू करण्याला परवानगी असणार आहे. परंतु मेट्रो, सिनेमागृहे सध्यातरी बंदच असणार आहे. शाळा, महाविद्यालये सप्टेंबर 30 पर्यंत बंदच ठेवण्यात येईल, राज्यातील जलतरण तलाव, मनोरंजन गृहे , जिम हे सुद्धा बंदच राहणार आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unlock 4: Forced e-pass for inter-district travel in the state; Learn all the other rules