अनलॉक 5: राज्यात रेल्वे रुळावर, तर शाळा-कॉलेज बंदच

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 30 September 2020

कोरोनातून राज्य आता हळूहळू बाहेर येताना दिसत आहे.

मुंबई- कोरोनातून राज्य आता हळूहळू बाहेर येताना दिसत आहे. राज्य सरकारनं राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्य व केंद्र सरकारनं दिलेल्या करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचं पालन करून ही रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. 

काय सुरु काय बंद

लोकलमधून डबेवाल्यांना प्रवासाला परवानगी

बार आणि रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याची मुभा

शाळा आणि कॉलेज 31 ऑक्टोंबरपर्यंत बंद

पुण्यातल्या लोकल सुरु होणार

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल फेऱ्या वाढवणार

5 ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट व बार सुरू करण्यास परवानगी

रेस्टॉरंट, बारमध्ये 50 टक्के ग्राहकांनाच प्रवेश देण्याचं बंधन

राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी.

मुंबईत अनावश्यक वस्तूंचं उत्पादन निर्मितीच्या उद्योगांना परवानगी

राज्यातील सिनेमागृहांना 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी

दरम्यान, राज्य सरकारने निर्बंथ शिथिल करण्यास सुरुवात केली असली, तरी कोरोनासंबंधीच्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unlock 5 Railways on track schools and colleges are closed