पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साठले आहे. सततच्या पावसाने पिके कुजण्याच्या अवस्थेत आहेत. कांदा पीक मातीमोल झाले असून, आंबा पिकाचा हंगामही अडचणीत सापडला. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यासह नाशिक, सोलापूर, पुणे व कोकणात जोरदार पावसाने नदी-नाल्यांना पूर येऊ लागले आहेत.