Jitendra Awhad : लखनौ रेल्वेचा 168 उंदीर पकडण्यासाठी 69 लाखांचा खर्च; आव्हाड म्हणाले गणपती बाप्पा...| Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad

Jitendra Awhad : लखनौ रेल्वेचा 168 उंदीर पकडण्यासाठी 69 लाखांचा खर्च; आव्हाड म्हणाले गणपती बाप्पा...

नवी दिल्ली - रेल्वे स्थानकांवर आणि फलाटांवर उंदीर फिरताना तुम्ही अनेकदाा पाहिले असतील. या उंदरांमुळे रेल्वे प्रशासन एवढं हैराण झालं की त्यांनी उंदीर पकडण्यासाठी 3 वर्षात 69 लाख रुपये खर्च केले आहेत. विशेष म्हणजे, ६९ लाख रुपये खर्चून केवळ १६८ उंदीर पकडण्यात आले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टीका केली आहे.

उत्तर प्रदेश रेल्वेच्या लखनौ विभागाने 69 लाख रुपये खर्च करून केवळ 168 उंदीर पकडले आहेत. आरटीआयमध्ये झालेल्या खुलाशानुसार ही रक्कम गेल्या तीन वर्षांत खर्च करण्यात आली. म्हणजेच दरवर्षी लखनौ विभागाने उंदीर पकडण्यासाठी २३.२ लाख रुपये खर्च केले. म्हणजे एक उंदीर पकडण्यासाठी 41 हजार रुपये खर्च झाले आहेत. चंद्रशेखर गौर यांनी आरटीआयमध्ये मागवलेल्या माहितीत हे उघड झाले आहे.

यावरून आव्हाड म्हणाले की, उत्तर प्रदेश सरकारने ३ वर्षांत ६९ लाख रुपये खर्च करून १६८ उंदीर पकडले अशी माहिती उपलब्ध झाली आहे. १ उंदीर पकडायला ४१,००० रुपये खर्च करणाऱ्या सरकारला गणपती बाप्पा सुबुद्धी देवो !