उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा पर्यटकांसाठी पर्वणी

uran pirwadi beach
uran pirwadi beachsakal media
Updated on

उरण : मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असणारा उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा (uran pirwadi beach) हा पर्यटकांसाठी पर्वणी (tourist attraction) ठरत आहे. सध्या लागून आलेल्या सुट्टीचा आनंद (holidays entertainment) घेण्यासाठी नवी मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण, डोंबिवली, कर्जत, खोपोली आणि उरण परिसरातील नागरिक पर्यटनासाठी येत आहेत.
मुंबईतील समुद्र किनारे (Mumbai beaches) हे गर्दीच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे तेथील समुद्र किनारे सोडले, तर पर्यटकांना उरण पिरवाडी समुद्र किनारा हा जवळचा आहे.

uran pirwadi beach
वॉशिंग मशिनमध्ये चक्क नागोबाचा घरोबा; मुलुंड येथील थरारक प्रकार

उरणला चारी बाजूने समुद्राने वेढलेले आहे; परंतु पिरवाडी किनारा हा निसर्गसंपन्न डोंगर कुशीत आहे. समोरच पूर्वेला द्रोणागिरी हा भला मोठा डोंगर आहे. आजूबाजूला परिसरही गर्द झाडीने भरलेला आहे. समुद्राचे पाणी नितळ असल्याने पर्यटक आपला आनंद मनमुरादपणे लुटत असतात. लहान मुले आणि मोठी मंडळीही वाळूमध्ये खेळत असतात. मनमोकळेपणाने आनंद लुटण्यास मिळत असल्याने पर्यटकांचा ओढा या या समुद्राकडे वाढत आहे.

किनाऱ्याचा विकास गरजेचा

सद्यस्थितीत पिरवाडी बीचकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे. मात्र, ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे, तसा येथील विकास झालेला नाही. बीचकडे दुर्लक्ष झाल्याने काही ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. या बाबींकडे सरकारने लक्ष केंद्रित करून पिरवाडी बीच सुसज्ज बनवला, तर पर्यटकांचा ओढा आणखी वाढू शकतो. परिणामी, स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com