मुंबई - राज्यातील वनाच्छदनाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानाअंतर्गत यावर्षी राज्यात दहा कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुढील वर्षीही दहा कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले.