व्होडाफोन आणि आयडियाच्या रेंजला ...

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 15 October 2020

सध्या पुण्यात व्होडाफोन आणि आयडिया म्हणजे VI च्या युजर्संना नेटवर्कमध्ये मोठी अडचण येत आहे.

पुणे: सध्या पुण्यात व्होडाफोन आणि आयडिया म्हणजे VI च्या युजर्संना नेटवर्कमध्ये मोठी अडचण येत आहे. विषेश म्हणजे ट्विटरवर व्होडाफोन आयडिया नेटवर्क (Vodafone Idea network) डाऊन ट्रेंड्स सुरु आहे. इथे  पुण्यातील VIचे युजर्स त्यांच्या नंबरसह कनेक्टिव्हिटीच्या समस्यांच्या तक्रारी करत आहेत. पुण्यासह गोवा, सांगली, मुंबई तसेच सातारा भागात VI च्या कनेक्टिव्हिटीला अजचणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

बुधवारी रात्रीपासूनच  इंटरनेटचा वापर करण्यात अडचणी येत असल्याचे युजर्सनी सांगितले आहे. तसेच काही युजर्सनी रिचार्ज केला असून त्यांचे प्लॅन्स अजून ऍक्टीवेट झाले नसल्याच्या तक्रारीही ट्विटरवर VI युजर्स करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'सध्या VI डाऊन आहे का? कोणतेही पेमेंट होत नाहीये तसेच 199 किंवा 198 वर फोनही लागत नाही.' अशी तक्रार शौकत अली या युजर्सने ट्विटर केली आहे. महाराष्ट्रातील 416416 या भागातील व्होडाफोनची सुविधा रात्रीपासून विस्कळीत झाली आहे. लवकर नीट होईल अशी काही चिन्हे दिसत नाहीत, अशी माहिती डॉ. साळूंखे यांनी दिली आहे.  

ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास आहेत त्यांनाही नेटवर्कमध्ये मोठी अडचण येत आहे. तशी माहिती विद्यार्थी ट्विट करून देत आहेत. ' माझ्याकडे व्होडाफोनचे दोन सीम कार्ड दोन वेगवेगळ्या मोबाईलमध्ये आहेत. पण दोन्हीही बंद असल्याने मला ऑनलाईन क्लासमध्ये प्रचंड अडचणी येत आहेत', अशी माहिती विद्यार्थी यश लोखंडे याने दिली आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळपासूनच व्होडाफोन सिमला अडचणी येत आहेत. सिमकार्ड रजिस्टर नाही, असा यरर येत असल्याचे, सुयश अभ्यंकर यांना सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Users Complainig Vodafone and Idea Network Down in Pune