

vaibhav maharashtrache podcast series
esakal
एक मे, म्हणजे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि गौरव साजरा करण्याचा दिवस. या सुवर्णदिनी 'सकाळ माध्यम समूहा'ने आपल्या वाचकांसाठी आणि श्रोत्यांसाठी ‘वैभव महाराष्ट्राचे’ ही एक विशेष ऑडिओ पॉडकास्ट मालिका सादर केली आहे.
महाराष्ट्राला समृद्ध आणि वैभवशाली बनविण्यात योगदान देणाऱ्या थोर संतांपासून, साहित्यातील महर्षी, कलावंत ते आधुनिक उद्योजकांपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास या मालिकेत उलगडणार आहे. वैभव महाराष्ट्राचे’ ही केवळ व्यक्तिमत्त्वांची मालिका नाही, तर महाराष्ट्राच्या आत्म्याचा, अभिमानाचा आणि प्रेरणेचा प्रवास आहे.