
Pankaja Munde: पंकजा मुंडे चेअरमन असलेला आणि स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी मोठ्या कष्टाने उभा केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री झाली आहे. ओंकार कारखान्यासोबत हा व्यवहार झाला असून ५०० कोटींचा कारखाना केवळ १३१ कोटींना विक्री केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या कारखान्याचे कायदेशीर सल्लागार राहिलेले अॅड. परमेश्वर गित्ते यांनी दोन महिन्यांपूर्वी झालेलं खरेदीखत उजेडात आणलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या जमिनीवर स्व. गोपीनाथराव मुंडे यांचं स्मारक उभं आहे, त्या गोपीनाथगडाच्या उत्तरेची जागाही विक्री करण्यात आलेली आहे. या सगळ्या प्रकाराबाबत पंकजा मुंडे यांनी मात्र मौन बाळगल्याचं दिसतंय.