
बीड : पवनचक्की खंडणी प्रकरणातील संशयित वाल्मीक कराड हाच सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण व हत्येच्या घटनेचा सूत्रधार आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करावा, या प्रकरणातील आरोपींना फाशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाजूला करावे. धनंजय मुंडे हेच सूत्रधाराचे आश्रयदाते असल्याचा आरोप विविध पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी (ता. २८) येथे काढलेल्या मोर्चात केला. खासदार बजरंग सोनवणे यांनी तर वाल्मीक कराड हा धनंजय मुंडेंच्या घरात असल्याचा आरोप करत पोलिस त्यांच्या घरी का जात नाहीत? असा सवाल केला.