
बीड : राज्यभर गाजत असलेल्या मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा वाल्मीक कराडच असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) विशेष तपास पथकाने (एसआयटी) केलेल्या तपासातून समोर आले आहे. ‘खंडणीला आडवे येणाऱ्यास आडवे करा’ अशी धमकीच वाल्मीकने देशमुखांना दिली होती.