बीड : आवादा कंपनीच्या मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पासाठी धमकावून दोन कोटी रुपयांची खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड आरोपी आहे. मात्र, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्याच्या सहभागाचा तपास करण्यासाठी कराडला येथील विशेष ‘मकोका’ न्यायालयाने बुधवारी (ता. १५) सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.