esakal | प्रकाश आंबेडकर म्हणाले, यासाठी मुख्यमंत्र्यांनी भेटीला बोलाविले होते!
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash Ambedkar

सीएए विरोधात वंचित बहुजन आघाडी 26 डिसेंबरला धरणे आंदोलन करणार आहे. दादरला हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याविषयी प्रकाश आंबेडकर हे मातोश्री या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेटीला आले होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, यासाठी मुख्यमंत्र्यांनी भेटीला बोलाविले होते!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (सीएए) वंचित बहुजन आघाडीकडून 26 डिसेंबरला आंदोलन करण्यात येणार आहे. याविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेटीला बोलाविले होते, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सीएए विरोधात वंचित बहुजन आघाडी 26 डिसेंबरला धरणे आंदोलन करणार आहे. दादरला हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याविषयी प्रकाश आंबेडकर हे मातोश्री या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेटीला आले होते. यावेळी कपिल पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

प्रेमी युगुलाचा 'कंट्रोल' सुटला अन् मग...

प्रकाश आंबेडकर म्हणाले, की मुख्यमंत्र्यांच्या निरोपामुळे भेटायला आलो होतो. 26 डिसेंबरला आम्ही सीएए विरोधात धरणे आंदोलन करणार आहोत. त्याबाबत चर्चा झाली. आम्ही त्यांना शांततेत आंदोलन करणार आहोत असे सांगितले. एनआरसीमुळे मुस्लिमांसह हिंदू नागरिकांनाही फटका बसला आहे. केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (आरएसएस) अपप्रचार सुरु आहे. शांततेत आंदोलन करा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. कोरेगाव भीमाबाबत माझ्याकडे असलेली माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे. 

loading image