
Vanjari Reservation: मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सोपी व्हावी, यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केलं. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणाचं फलीत म्हणून सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी शासन निर्णय काढला होता.
ओबीसी समाजातल्या काही घटकांकडून सुरुवातीला या गॅझेटला कडाडून विरोध झाला होता. मात्र गॅझेटमध्ये असलेल्या वेगवेगळ्या नोंदी बघून विरोध मावळला अन् आरक्षणाची नवीन मागणी पुढे येऊ लागली. हैदराबाद गॅझेटमध्ये वंजारी समाजाचा उल्लेख एसटी प्रवर्गात असल्याचा दावा केला जात आहे.