Vardha Abortion Case; गोबरगॅस मधून मिळाली अजून एक कवटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kadam Hospital

कदम हॉस्पिटल गर्भपात प्रकरण; गोबरगॅस मधून मिळाली अजून एक कवटी

आर्वी : अवघ्या तेरा वर्षाच्या मुलीचा गर्भपात प्रकरणाने गती घेतली असुन नागपूर व वर्धा येथील न्याय वैद्यकीय प्रयोग शाळेच्या चमुने शुक्रवारी (ता.१४) कदम हॉस्पिटल परिसराची झाडाझडती घेतली. गोबर गॅस प्लँटचा पुन्हा उपसा केला असता त्यातुन अजून एक मानवी कवटी मिळाली आहे. तर, गर्भपात झाल्यानंतर बाथरुम मध्ये पडलेल्या अर्भकाच्या ठिकाणचे रक्ताचे नमुने मिळाले असल्याने अरोपी डॉ, रेखा कदम हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Vardha Kadam Hospital Abortion Case)

येथील पाच वर्गात शिकत असलेल्या तेरा-चौदा वर्षाच्या मुलीला अवैध संबंधात पाच महिण्याची गर्भधारणा झालेली होती. ३० हजार रुपये घेवुन डॉ. रेखा निरज कदम हिने कायदेशीर प्रक्रिया पुर्ण न करता पैशाच्या हव्यासा पोटी अवैध्यरित्या तिचा गर्भपात केला. हे प्रकरण पोलीसांपर्यंत पोहचले असून यात पोलिसांनी डॉ. रेखा कदम, दोन नर्स व इतर दोन व्यक्तींना अटक केली.

हेही वाचा: इयत्ता पाचवी - आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्या

प्रकरण गंभीर असल्यामुळे याची मोठ्या प्रमात दखल घेण्यात आली. जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळोंके, ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जोस्ना गिरी यांनी जलद गतीने तपास सुरू केला. तपासात दिवसेंदिवस तपास पुढे सरकुला लागला. गुरुवारी (ता.१३) कदम हॉस्पिटलच्या परिसरात असलेल्या गोबर गॅस प्लॅन्ट मधुन ११ मानवी कवट्या व ५४ हाडे मिळुन आली आणी राज्यभर खळबळ माजली महिला आयोग असो अथवा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे अध्यक्ष असलेल्या राज्य पर्यवेक्षक मंडळ असो सर्वांनी याची दखल घेतली.

पोलीसांच्या तपासाला गती आली जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांनी विशेष तपास पथक गठीत केले. या तपास पथकाच्या माध्यमातुन शुक्रवारी (ता.१४) नागपुर व वर्धा येथील न्याय वैध्यकीय प्रयोग शाळेच्या चमुने कदम हॉस्पीटलची पुन्हा झाडाझडती घेतली. गोबर गॅस प्लॅन्टचा उपसा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडुन करुन घेतला यात पुन्हा एक मानवी कवटी मिळाली असुन कवट्यांची संख्या आता बारा झाल्या आहेत.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील पाच हजार १८० बालकांना जन्मतःच विविध दुर्धर आजार

तर दुसरीकडे गर्भपात करुन घेण्याकरीता भरती झाल्यानंतर डॉ. रेखा कदम हिने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या. या गोळ्यांचा परिणाम होवुन गुरूवारी (ता.सहा) भल्या पहाटे हॉस्पीटलच्या बाथरुम मध्ये तिचा गर्भपात होवुन अर्भक पडले होते. त्या ठिकाणच्या रक्ताचे नमुने सुध्दा या झाडाझडती मध्ये पोलीसांना प्राप्त झाले आहे. यामुळे डॉ रेखा कदम यांच्या अडचणीत अजुन वाढ झाली आहे.

राज्य पर्यवेक्षक मंडळाच्या अशासकीय सदस्या डॉ. आशा मिरगे यानी दिली भेट़

येथील कदम हॉस्पीटल मध्ये घडलेल्या तेरा वर्षीय बालीकेच्या गर्भपाताचे प्रकरण कळताच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे अध्यक्ष असलेल्या राज्य पर्यवेक्षक मंडळाच्या अशासकीय सदस्या तथा स्त्री रोग तज्ञ डॉ.आशा मिरगे यांनी भेट देवुन कदम हॉस्पीटलची पुर्ण पाहणी केली वैध्यकीय नियमानुसार त्यांना यात अनेक तृट्या आढळुन आल्या. सोनीग्राफी मशीनचे सुध्दा अवलोकन केले तर त्याचा परवाना मुदत बाहेर झाल्याचे दिसुन आले. याशिवाय येथील उपजिल्हा रुग्णालयाला सुध्दा त्यांनी भेट देवुन वैध्यकीय अधिक्षक मोहन सुटे यांच्या जवळुन सखोल माहिती घेतली आहे. शासनाच्यावतीने हॉस्पीटलच्या तपासाच्या नोंदी असो अथवा हॉस्पीटलने गर्भपाताच्या संबंधात कळवीलेला मासिक अहवाल असो यांची सुध्दा त्यांनी यावेळी पाहणी केली आहे.

हेही वाचा: पुणे : बिल्डरांना दिलासा; प्रीमियम FSIJ शुल्क भरण्यास मुदतवाढ

घटनेचा निषेध करुन माहिती कळविण्याचे केले आवाहन

कदम हॉस्पीटल मध्ये घडलेली कृत्य अत्यंत निंदणीय आहे. अशी घटना घडत असेल तर याचा सर्वस्तरावरुन निषेध केला पहिजे. या घटनेची सर्वच स्तरातुन कारवाई होण्याकरीता प्रयत्न केल्या गेले पाहिजे. पोलीस चांगल्यापध्दतीने तपास काम करीत आहे. जनतेला अशाच अन्य काही घटनांची माहिती असेल तर त्यांनी पुढे येवुन पोलीसांना कळवीले पाहिजे जेणेकरुन असे नराधम सुटणार नाही असे आवाहन केले.

प्रकृती अस्वस्थामुळे सासुबाई अटके पासुन दुर

आरोपी असलेल्या डॉ. रेखा निरज कदम हिने सासुबाई डॉ. शैलजा कदम यांच्या गर्भपात केंद्रात तेरा वर्षाच्या बालीकेचा गैरकायदेशीर रित्या गर्भपात करुन हॉस्पीटलच्या आवारातच अर्भक नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सासुबाईला गत दोन दिवसापासुन अटक करण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहे असले तरी प्रकृती अस्वस्थामुळे त्या अटके पासुन सध्यातरी दुर आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Maharashtra Newsabortion
loading image
go to top