esakal | पालकांना दिलासा देणारा निर्णय; खासगी शाळांचे शुल्क १५ टक्के कमी होणार
sakal

बोलून बातमी शोधा

varsha gaikwad

पालकांना दिलासा; खासगी शाळांचे शुल्क १५ टक्के कमी होणार

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई: नुकतीच राज्य मंत्रीमंडळाची बैठक संपली. या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शालेय शुल्काबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राजस्थान सरकारच्या धरतीवर महाराष्ट्रातही खासगी शाळांचे शुल्क १५ टक्के कमी करणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. लवकरच राज्य सरकार फी कपातीचा आदेश काढणार आहे. या वर्षासाठी हा निर्णय लागू असणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

हेही वाचा: जयंत पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

पालकांकडून दरवर्षीप्रमाणे पूर्ण फी मागितली जात असल्याची तक्रार केली जात होती. शाळा बंद असल्याने शाळेतील विविध विषयांच्या प्रयोगशाळा, संगणकाचे प्रशिक्षण, विविध उपक्रम, शाळेचे मैदान, ग्रंथालय अशा गोष्टी सध्या वापरात नाहीयेत. तर त्यासंदर्भातील फी का आकारली जातेय, असा पालकांचा सवाल आहे. त्यामुळेच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

ज्यांनी याआधीच पूर्ण फी भरलीय त्यांच्याबाबतची स्पष्टता येणाऱ्या काळात देऊ, असंही त्या म्हणाल्या. आता या निर्णयानुसार, पालकांना फक्त ८५ टक्के फी भरावी लागणार आहे. याआधीच शाळांना फी वाढवू नये याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे या नव्या निर्णयामुळे पालकांना देखील दिलासा मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने याआधीच सांगितलं होतं त्यानुसार आज हा निर्णय घेण्यात आला आहे.

loading image
go to top