

Dispute Over Election Symbol and Its Impact
Sakal
विरार : भाजपच्या विरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयन्त वसई विरार मध्ये बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी करत असून ,एकत्र येण्यावर सर्वांचे एकमत झाले असलेबतरी ही युती चिन्हावर अडली असल्याचे संकेत मिळत आहेत. वसई विरार महापालिकेसाठी महाविकास आघाडीने हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीसोबत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी आता समान चिन्हाच्या आग्रहामुळे पेच निर्माण झाला आहे. आमच्या शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवावी असे ठाकूरांनी उबाठा आणि कॉंग्रेसला सांगितले आहे.