Vasant More News : राज ठाकरेंच्या बेशिस्त नेत्यांना इशाऱ्यांनंतर वसंत मोरे बोलले; म्हणाले… | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vasant more first reaction mns raj thackeray letter to party leaders over social media use

Vasant More News : राज ठाकरेंच्या बेशिस्त नेत्यांना इशाऱ्यांनंतर वसंत मोरे बोलले; म्हणाले…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पत्र लिहीत मनसैनिकांना तंबी दिली हे. माझ्या पक्षातल्या कोणालाही, पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, माझ्याशी बोला असे राज ठाकरे यांनी सुनावलं आहे. या पत्रात मनेसे नेत्यांसोबतच हा वसंत मोरे यांनी इशारा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. दरम्यान या पत्रानंतर वसंत मोरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्रानंतर वसंत मोरे यांनी राज साहेबांच्या आदेशाचे मी तंतोतंत पालन करणार आहे, अशी प्रतिक्रिया "सकाळ" ला दिली आहे. राज ठाकरेंच्या त्या पत्राचा मजकूर हा पक्षातील नाराज असलेल्या वसंत मोरे यांना इशारा असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या. या संबंधी आता वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला असून फक्त "मी राज साहेबांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणार आहे" असे वसंत मोरे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

हेही वाचा: Raj Thackeray : "...तर हकालपट्टी अटळ आहे", राज ठाकरेंचा वसंत मोरेंना इशारा?

पत्रात काय म्हटलंय?

"सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स ह्याच्याने हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही." असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

हेही वाचा: Navneet Rana News : नवनीत राणांची खासदारकी जाणार? जात प्रमाणपत्र प्रकरणी दोषमुक्तीला कोर्टाचा नकार

पुढे त्यांनी "माझ्या पक्षातल्या कोणालाही, पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, माझ्याशी बोला. पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा. पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा." म्हटलंय. ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे ह्याची नोंद घ्या! असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.