मुंबई - ‘माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या कार्याची धुरा त्यांच्या नातसून जयश्री पाटलांनी सांभाळली, पण पक्षाने काही त्यांना सांभाळले नाही. मात्र भाजप परिवारामध्ये त्यांची आणि कार्यकर्त्यांची आपुलकीने काळजी घेतली जाईल,’ असे टोले काँग्रेसला मारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयश्री पाटील यांचे भाजपमध्ये स्वागत केले.