Vedanta-Foxconn प्रकल्प गुजरातनं पळवलाय; अंबादास दानवेंचा आरोप

'वेदांता गेल्याचं मविआवर खापर फोडलं जात आहे. मात्र, हा प्रकल्प गुजरातनं पळवला आहे.'
Ambadas Danve
Ambadas Danveesakal
Summary

'वेदांता गेल्याचं मविआवर खापर फोडलं जात आहे. मात्र, हा प्रकल्प गुजरातनं पळवला आहे.'

पुण्यातील तळेगाव (Talegaon) इथं नियोजित असलेला वेदांता आणि फॉक्सकॉन या कंपनीचा प्रकल्प (Vedanta Group and Foxconn Company Project) गुजरात (Gujarat) राज्यात गेल्यामुळं विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवलीय. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीही शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलंय.

माध्यमांशी संवाद साधताना दानवे म्हणाले, वेदांता गेल्याचं मविआवर खापर फोडलं जात आहे. मात्र, हा प्रकल्प गुजरातनं पळवला आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. मुंबईचा बाजार पळवला जातोय. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑफिसेस पळवले जाताहेत. एअरलाइन्सचं ऑफिस पळवलं जातंय. याला फक्त आत्ताचं सरकार कारणीभूत आहे. जवळपास 1 लाख युवकांना फॉक्सकॉन कंपनीच्या माध्यमातून रोजगार मिळाला असता. पण, या सरकारनं ते होऊ दिलं नाही, असा घणाघात त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला. हे सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.

Ambadas Danve
Islamic State : 'इस्लाम' वाचवण्यासाठी भारतावर हल्ला करा; दहशतवादी संघटनेचं मुस्लिमांना आवाहन

काय म्हणाले होते उदय सामंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींशी याबाबत चर्चा केली असून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिलंय. कंपनीला वेळेत Incentive पॅकेज दिलं गेलं असतं तर हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गेला नसता. परंतु, याचं खापर शिंदे आणि फडणवीस सरकारवर फोडलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भविष्यात याच तोडीचा किंबहुना यापेक्षा मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्राला, युवा पिढीला देऊ.. जो रोजगार अपेक्षित आहे, तो आम्ही उपलब्ध करून देऊ, असं आश्वासनही मुख्यमंत्री शिंदेंना दिल्याचं मंत्री उदय सामंतांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com