Uday Samant : नुसतं परदेशातील उद्योजकांना भेटून प्रकल्प येत नसतात, तर...; सामंतांचा अजित पवारांवर पलटवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uday Samant

Vedanta Foxconn : नुसतं परदेशातील उद्योजकांना भेटून प्रकल्प येत नसतात, तर...; सामंतांचा अजित पवारांवर पलटवार

फॉक्सकॉन वेदांता हा प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर महाराष्ट्राला गाजर दाखवण्याचे काम सुरू आहे, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. त्यांच्या टीकेनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पलटवार केला आहे. (Vedanta Foxconn Industries Minister Uday Samant reply to Leader of Opposition Ajit Pawar )

नुसतं परदेशात उद्योजकांना भेटून आपल्या राज्यात प्रकल्प येत नसतात, तर त्यासाठी उद्योगांना आपण सरकारतर्फे काय देतो, यासाठी हायपॉवर समितीची स्थापना करावी लागते, असं वक्तव्य उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.

तसेच, मविआ सरकारने 7 महिन्यांत या प्रकल्पासाठी काहीही केलं नाही. 15 जुलैला शिंदे सरकार आल्यानंतर यासाठीची हायपॉवर कमिटी स्थापन झाली. 38 हजार 831 कोटींचं इंसेंटिव्ह पॅकेज मंजूर केलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यासाठी प्रयत्न करत आहेत. कालच वेदांता ग्रुपचे मालक अग्रवाल यांनी केलेलं ट्विट याच प्रयत्नांना आलेलं यश आहे. वेदांता प्रकल्पाशी संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिले आहे. अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.

माझ्या राजीनामा देण्याच्या मागणीपूर्वी मग ७ महिने हायपॉवर कमिटी का झाली नाही? याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे. रिफायनरीला कोण विरोध करतं याचेदेखील उत्तर विरोधकांनी जनतेला दिले पाहिजे. आणि ज्या काही गोष्टी ठरवुन बोलल्या जात आहेत. आणि स्वतःच कर्म आहे त्याच खापर दुसऱ्यांच्या माथेवर फोडण्याची कृती फार चुकीची असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चाळीसगावात असताना ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पाच्या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फॉक्सकॉन वेदांता हा प्रकल्प राज्यात यावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न झाले होते. मात्र हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात राज्यात गेल्यामुळे मोठी गुंतवणूक राज्यातून गेली आहे.

या प्रकल्पासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांचा सुरुवातीला विचार करण्यात आलेला होता. आमचा कोणत्याही राज्याला विरोध नाही, पण आमच्या राज्यातील प्रकल्प कोणाच्या तरी दुर्लक्षामुळे बाहेर जात असेल तर ते महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: Vedanta Foxconn Industries Minister Uday Samant Reply To Leader Of Opposition Ajit Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :uday samantEknath Shinde