
पाच राज्यांचा सर्व्हे, १०० मुद्द्यांच्या विचारानंतर महाराष्ट्राला मिळाला होता प्रकल्प - अजित पवार
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेचे झोड उठवली जात आहे. या सर्वामध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी हा प्रकल्प महाराष्ट्रातच राहावा यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात यावे अशी विनंती केली आहे.
महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा हा प्रयत्न असून, महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न असल्याचाही आरोप पत्रात करण्यात आला आहे. बुधवारी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार औरंगाबाद विमान तळावर पत्रकारांशी बोलताना सांगितल की वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पला जागा तळेगाव येथे दिली होती. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पामध्ये वेदांत 60 टक्के तर तैवान 40 टक्के गुंतवणूक करणार होते.
आणि या प्रकल्पामध्ये 2 लाख कोटींची गुंतवणूक आणि सुमारे दीड लाख ते दोन लाख रोजगार मिळवून देणारा हा प्रकल्प होता. या प्रकल्पाच्या आधिकाऱ्यांनी देशातील महाराष्ट्र,गुजरात, कर्नाटक, तेलंगणा,आंध्र प्रदेश, यासारख्या राज्यांच्या सर्वेनंतर. शेवटी महाराष्ट्रात 100 मुद्यांचा विचार करून तळेगाव मधील 1 हजार एकर जागेची निवड केली होती. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी नष्ट झाली असते. परंतु हा प्रकल्प राज्या बाहेर गेला तर खूप मोठा फटका महाराष्ट्राला बसणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून तो प्रकल्प राज्यातच कसा राहिल यासाठी त्यांनी प्रसत्न करावेत. असे अजित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.