
पाली : सुधागड तालुक्यात शुक्रवारी (ता. 25) मुसळधार पाऊस पडत होता. हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देखील जाहीर केला होता. सुधागड तालुक्यातील भेरव गावाजवळील खुरावले फाटा येथील अंबा नदीवरील पुलावरून सकाळी पाणी वाहत होते. यावेळी वाहत्या पाण्यातून पुलाच्या दोन्ही बाजूला जीव धोक्यात घालून वाहने पाण्यातून जात होती. तसेच नागरिक देखील चालत गेले.