
Kamlakar Nadkarni : जेष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन
मुंबईः ज्येष नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन झालं आहे. रात्री १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या सकाळी ११ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.
२०१९ मध्ये प्रसिद्ध नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी अखिल भारतीय नाट्यपरिषदेने जीवनगौरव सन्मान प्रदान केला होता. त्यांना आपल्या वृत्तपक्षीय समीक्षेने अनेक कलाकृतींचं विश्लेषण केलं.
रंगभूमीचा प्रत्यक्षानुभव, नाटकाची प्रचंड आवड आणि अभ्यासू वृत्ती यांच्या समन्वयातून त्यांच्यातला समीक्षक घडत गेला. वयाची ऐंशी पार करूनही त्यांचे नाटय़वेड तसूभरही कमी झालेलं नव्हतं. आज रात्री १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
‘जाणता राजा’ या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्यक्रमावर ‘द ग्रेट बाबासाहेब सर्कस’ या मथळ्याखाली त्यांनी पुरंदरे यांच्यावर टीका केली होती. तेव्हा ते चर्चेत आले होते. आज त्यांच्या जाण्याने सर्व स्तरातून दुःख व्यक्त होत आहे.