Video: "लम्पीचं संकट दूर करं"; पांडुरंगाला साकडं अन् दंडवत घालत सुरु केला प्रवास

विकास खोत यांच्याकडं जनावरं नाहीत पण त्यांना जनावरांचं दुःख सहन झालं नाही.
Lumpy disease
Lumpy disease
Updated on

सांगोला : देशभरात लम्पी आजारानं मोठा धुमाकूळ घातला. यामुळं पशूपालक शेतकरी मोठ्या संकटात सापडला. जनावरांच्या या वेदना बघवणाऱ्या नव्हत्या. याचमुळं व्यथीत झालेल्या हातकणंगलेच्या विकास खोत यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला साकडं घातलं आणि दंडवत घालत त्यांनी आपला प्रवास सुरु केला. याचा व्हिडिओ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी फेसबूकवर शेअर केला आहे. (Video for solution on Lumpy disease Vikas Khot going bowed down to Pandharpur from Hatkangale)

राजू शेट्टी म्हणतात, लम्पी आजारानं देशात धुमाकूळ घातलेला आहे. देशातील पशुपालक मोठ्या संकटात सापडलेला आहे. दररोज शेकडो जनावरे या आजाराने दगावली जात आहेत. शेतकऱ्यावर आलेलं हे संकट दूर व्हावं यासाठी तारदाळ (ता. हातकंणगले) इथले विकास खोत हे तारदाळ महादेव मंदिर ते पंढरपूरपर्यंत दंडवत घालत निघाले आहेत. विकास यांच्याकडं जनावरं नाहीत पण या आजारामुळं जनावरांना ज्या वेदना होवू लागल्या आहेत त्या वेदना त्यांना असह्य झाल्यामुळं ते परमेश्वराकडं साकड घालण्यासाठी जात आहेत. आज दुपारपर्यंत विकास खोत हे दंडवत घालत जवळपास सांगोल्याहून पुढे गेले आहेत.

लम्पीचा गोवंशाला धोका

लम्पी हा आजार प्रामुख्यानं गोवंशातील जनावारांना होतो. हा अत्यंत संसर्गजन्य असून, यामुळं देशभरात सुमारे 57 हजारांहून अधिक जनावरांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचं केंद्र सरकारनं 9 सप्टेंबर 2022 रोजी सांगितलं होतं. आतापर्यंत लम्पीच्या प्रादुर्भावामुळे 15.21 लाख जनावरं प्रभावित झाल्याचंही सरकारनं म्हटलं आहे. महाराष्ट्रासह, गुजरात, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली अशा किमान आठ राज्यांत लम्पीच्या केसेस नोंदल्या गेल्या आहेत.

लम्पी स्किन डिसीज म्हणजे काय?

लम्पी हा जनावरांमधील एक विषाणूजन्य त्वचा रोग आहे. हा आजार प्रचंड संसर्गजन्य असून त्याचा प्रसार माश्या, डास, गोचीड यांसारख्या कीटकांद्वारे होतो. हा पॉक्सिव्हिरिडी कुळातला कॅप्रीपॉक्सव्हायरस आहे, अशी माहिती वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अ‍ॅनिमल हेल्थ अर्थात डब्ल्यूओएएचने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com