Video : स्टेजवर PM मोदी अन् राज्यपाल कोश्यारी आमने-सामने आले, अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

Video : स्टेजवर PM मोदी अन् राज्यपाल कोश्यारी आमने-सामने आले, अन्...


नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सुमारे ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं. यामध्ये अनेक महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. मोदींच्या कार्यक्रमात राज्यपाल उपस्थित राहणार होते. त्यामुळे या लोकार्पण सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. (Narendra Modi news in Marathi)

हेही वाचा: PM मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यात कोणकोणत्या महत्वाच्या प्रकल्पांचं होणार लोकार्पण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. लोकार्पण सोहळ्यासाठी स्टेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले तेव्हा त्यांनी राज्यपाल कोश्यारींकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं. याबाबतचा व्हिडीओ देखील समोर आलं आहे.

हेही वाचा: Chandrakant Patil : शाईफेकीच्या घटनेवरून थेट हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील यावरूनच मोदींसह भाजपवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा लाभला आहे. मात्र याच महापुरुषांचा सातत्याने अवमान करण्यात येत आहे. राज्यपालांनी महाराजांचा अवमान केला. तेच राज्यपाल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर बसलेले दिसतात, मग आम्ही काय समजायचं, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

राज्यपाल यांच्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या व्यतिरिक्त भाजपचे इतर नेते देखील सातत्याने महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत.