
Monsoon Session 2025: विधानभवनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या जोरदार राड्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र शब्दांत आपला संताप व्यक्त केला असून, त्यांनी थेट विधानभवनाच्या सुरक्षिततेवर आणि तेथील वातावरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.