Vidhan Sabha 2019 : काँग्रेसची मोठी खेळी; मुख्यमंत्र्याच्या विरोधात 'हा' तगडा उमेदवार?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोठी खेळी खेळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न चालू आहेत. माजी खासदार काँग्रेस नेते नाना पटोले हे मुख्यमंत्र्याच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार असू शकतात.

पक्षाने मला संधी दिली तर मी विधानसभा निवडणूक लढवेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ही निवडणूक लढवण्यासठी तयार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे. नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली.

सत्तेचा दुरुपयोग केला म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही नाना पटोले यांनी यावेळी केली.  मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाला यात गैरव्यवहार झाल्याचा संशय आल्याने त्यांनी ही  जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतली. उच्च न्यायालय हे स्वत: करते म्हणजे यात गडबड झाली असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे.

अ‍ॅक्सिस बँकेत पोलीसांचे पगार काढण्यासाठी निर्णय घेतला आणि पदाचा दुरुपयोग केला हा आरोप खोटा असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. पोलिस पगारांबाबतचा जीआर 2005 साली काढला असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. फडणवीस यांच्याएवढा खोटा मुख्यमंत्री राज्याने पाहिला नव्हता. 2005 साली 15 बँकांचा जीआर काढला होता. मात्र, 2017 साली पोलिस मुख्यालयातून एक परिपत्रक काढण्यात आलं आणि पोलिसांचे पगार अ‍ॅक्सिस बँकेतून करण्याचा निर्णय झाला असल्याचेही नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.

विलासराव देशमुखांनी 2005 साली 15 बँकांचे परिपत्रक काढले त्यांच्या पत्नी कुठल्या बँकेत नव्हत्या, हे परिपत्रक काढलं तेव्हा अमृता फडणवीस या अ‍ॅक्सिस बँकेत होत्या. पाच वर्षात अमृता फडणवीस यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी बढती कशी झाली, असा सवालही नाना पटोले यांनी यावेळी केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 congress leaders may contest against cm devendra fadnavis