Vidhan Sabha 2019 : अशी आहे काँग्रेसची पहिली यादी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर होणार असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी छाननी समितीच्या बैठकीनंतर 20 सप्टेंबरला यादी जाहीर होईल, असे सांगितले होते.

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर होणार असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी छाननी समितीच्या बैठकीनंतर 20 सप्टेंबरला यादी जाहीर होईल, असे सांगितले होते.

निवडणूक तारखांची घोषणा होण्याआधीच काँग्रेस आपली पहिली उमेदवार यादी जाहीर होणार असून यामध्ये अनेक बड्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाही काँग्रेस पुन्हा संधी देण्याच्या विचारात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या पहिल्या 30 उमेदवारांची संभाव्य यादी आली आहे.

काँग्रेस उमेदवारांची संभाव्य यादी

1) बाळासाहेब थोरात - संगमनेर
2) अशोक चव्हाण - भोकर
3) पृथ्वीराज चव्हाण - कराड दक्षिण
4) विजय वडेट्टीवार - ब्रह्मपुरी
5) केसी पडवी - अक्कलकुवा
6) नसीम खान - चांदवली
7) वर्षा गायकवाड - धारावी
8) अमीन पटेल - मुंबादेवी
9) यशोमती ठाकूर - तिवसा
10) विश्वजीत कदम - पलूस-कडेगाव
11) ऋतुराज पाटील - कोल्हापूर दक्षिण
12) पी. एन. पाटील - करवीर
13) अमित देशमुख - लातूर
14) धीरज देशमुख - लातूर ग्रामीण
15) बसवराज पाटील - औसा
16) मधुकर चव्हाण - तुळजापूर
17) वसंत चव्हाण - नायगाव, (नांदेड)
18) डी पी सावंत - नांदेड उत्तर
19) कैलास गोरंट्याल - जालना
20) कल्याण काळे - फुलंब्री
21) सुरेश वरपूडकर - परभणी
22) डॉ. संतोष तारफे - कळमनुरी
23) वसंत पुरके - राळेगाव
24) रणजित कांबळे - वर्धा
26) अमर काळे - आर्वी
27) सुनील केदार - सावनेर
28) हर्षवर्धन सपकाळ - बुलढाणा
29) माणिक जगताप - महाड
30) रमेश बागवे - पुणे कॅन्टॉन्मेंट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 congress may announce their first candidate list for maharashtra