एबी फॉर्म म्हणजे नेमके असते तरी काय?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले असून, उमेदवारी पक्षाने एबी फॉर्म दिला, याबाबतच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पण, एबी फॉर्म म्हणजे नेमके असते तरी काय? याबाबत अनेकांना प्रश्न पडताना दिसतो.

मुंबई : विधानसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले असून, उमेदवारी पक्षाने एबी फॉर्म दिला, याबाबतच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पण, एबी फॉर्म म्हणजे नेमके असते तरी काय? याबाबत अनेकांना प्रश्न पडताना दिसतो.

निवडणूक प्रक्रियेत 'एबी फॉर्म'ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण, यामुळेच संबंधित उमेदवार हा 'एबी फॉर्म' देणाऱ्या पक्षाचा अधिकृत उमदेवार समजला जातो आणि त्याला संबंधित पक्षाचे अधिकृत चिन्हंही दिले जाते.

काय आहे 'एबी फॉर्म'?

  •  एबी फॉर्म' हा पक्ष आणि त्या पक्षाचे अधिकृत चिन्हं मिळवण्यासाठीचा महत्त्वाचा दस्तावेज आहे.
  •  ए फॉर्म' हा त्या पक्षाची मान्यता आणि चिन्ह यासाठीचा अधिकृत दस्तावेज आहे.
  •  ए फॉर्म'वर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते.
  •  'बी फॉर्म' हा अधिकृत उमेदवारासंदर्भातील दस्तावेज आहे.
  •  'बी फॉर्म'वर पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह पक्षाने सूचवलेल्या आणखी एका उमेदवाराचे नावं असते. काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर दुसऱ्याला निवडणूक आयोग अधिकृत करु शकतो.

उमेदवारी अर्ज भरताना सर्वच गोष्टी अगदी काटेकोरपणे तपासल्या जातात. त्यात 'एबी फॉर्म' हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज ठरतो. उमदेवारीच्या वेळी पक्षाचा उल्लेख करणाऱ्या उमेदवाराला 'एबी फॉर्म' द्यावाच लागतो. तो 'एबी फॉर्म' सादर करु शकला नाही तर त्याचा दावा न्यायालयही ग्राह्य धरत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 What is AB form? Why does the AB form matter?