Vidhan Sabha 2019 : मनसेच्या पहिल्या यादीत सगळेच नवखे उमेदवार

सकाळ न्यूज नेटवर्क 
Wednesday, 2 October 2019

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवार याद्या जाहीर होत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (मनसे) आज पहिली यादी जाहीर केली. त्यात बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई या माजी आमदारांचा समावेश नसून नवखे उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

विधानसभा 2019  
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवार याद्या जाहीर होत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (मनसे) आज पहिली यादी जाहीर केली. त्यात बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई या माजी आमदारांचा समावेश नसून नवखे उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षांसह वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्ष यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. सुरवातीला विधानसभा लढवायची किंवा नाही, या संभ्रमात असलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शेवटी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. काल मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यात निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे राज यांनी जाहीर केले होते. त्यानुषंगाने मनसेने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत माजी आमदारांचा समावेश नाही आणि नवीन पदाधिकाऱ्यांना मैदानात उतरविले आहे. यामध्ये धुळे येथील आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील या शेतकऱ्याचा मुलगा नरेंद्र यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha All new candidates in the first list of MNS