सोमय्यांची ईडी चौकशी थांबवण्यासाठी भाजपशी मुश्रीफांचे साटेलोटे; सेना नेत्याचा गौप्यस्फोट l KDCC Bank Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viajy Devane,hasan mushrif

चंद्रकांत पाटील यांच्यावर टिका करणारे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आठ दहा-दिवस मात्र गप्प का आहेत?

सोमय्यांची ईडी चौकशी थांबवण्यासाठी भाजपशी मुश्रीफांचे साटेलोटे

मुरगूड (कोल्हापूर) : भाजपला (BJP) पाच जागा देण्याचे गौडबंगालच आहे, दररोज भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्यावर टिका करणारे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) आठ दहा-दिवस मात्र गप्प का आहेत?,असा सवाल उपस्थित करुन आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, तुम्ही किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya)लावलेली ईडीची चौकशी बंद करा, असे मंत्री मुश्रीफ आणि चंद्रकांतदादा (Chandrkant Patil)यांचे साटेलोटे झाल्याची शक्यता आहे, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे विजय देवणे (Viajy Devane) यांनी केला.

मुरगूड (ता.कागल) येथे राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या कागल तालुक्यातील ठरावधारक सभासदांच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. आमदार प्रकाश आबिटकर, जि. प. सदस्या शिवानी भोसले, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, बाबासाहेब देवकर, विश्वास कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: कर्नाटक सीमेवरून महाराष्ट्राच्या 13 बसेस फिरल्या माघारी

तीन जागांची मागणी

खासदार संजय मंडलिक म्हणाले, जिल्हा बँकेची निवडणूक ही कायमच कागल तालुक्याच्या अस्मितेची ठरली आहे. शिवसेनेची जिल्ह्यातील ताकद लक्षात घेता आम्ही तीन जागांची मागणी केली होती. एक जागा जादा मागितली यात काय चुकलं? आम्हाला जर पँनेल करायचेच असते तर सहा महिन्यापूर्वीच मोर्चेबांधणी केली असती.

सुरेश कुऱ्हाडे म्हणाले,एका बाजूला नेत्यांना बसायला कमी पडतयं,तर दुसरीकडे स्वाभिमानी जनता घेवून आम्ही लढतोय. उत्तम कांबळे म्हणाले, आघाडीचे नेते काहींचा पँनेलमध्ये घेवून तर काहीचा पँनेलच्या बाहेर ठेवून करेक्ट कार्यक्रम करण्याच्या नादात होते.अतुल जोशी यांचेही भाषण झाले.यावेळी बिद्रीच्या आनंदा पाटील यांनी श्री. मंडलिक यांना नोटांचा हार घातला.

विजय भोसले यांनी स्वागत केले. राजेखान जमादार यांनी प्रास्ताविक केले. सुहास खराडे यांनी आभार मानले. क्रांतीसिंह पोवार - पाटील, लतिका शिंदे, रेखा कुऱ्हाडे, आर.डी. पाटील, आप्पासाहेब पाटील, प्रकाश पाटील, दत्ता सोनाळकर, शिवाजी इंगळे आदी उपस्थित होते.

मग चेअरमन झाले

जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीचा संदर्भ देताना खासदार मंडलिक (Sanjay Mandlik) म्हणाले, मुश्रीफ यांच्याकडे आठ संचालक होते. मी नववा गेलो. मला बोलवायला बाबासाहेब आसुर्लेकर हेच आले होते. मी गेलो आणि मग मुश्रीफ चेअरमन झाले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top