Vijay Shivtare News :...म्हणून मी बारामती लढवणार.. अजित पवारांना आव्हान देत विजय शिवतारेंची मोठी घोषणा

vijay shivtare announced contest Lok Sabha Election 2024 from Baramati : एकनाथ शिंदेंच्या शिवेसनेचे नेते विजय शिवतारे हे बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
Vijay Shivtare On contesting Lok Sabha Election 2024 from Baramati
Vijay Shivtare On contesting Lok Sabha Election 2024 from Baramati

Vijay Shivtare On contesting Lok Sabha Election 2024 from Baramati : एकनाथ शिंदेंच्या शिवेसनेचे नेते विजय शिवतारे हे बारामतीमधून लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहेत. आज पत्रकार परिषद घेत शिवतारे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. याबद्दल पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने ठराव पास करण्यात आला आहे असेही ते म्हणाले. त्यामुळे बारामती येथील लोकसभेची निवडणुक आता तिरंगी होण्याची चिन्हे आहेत. (Baramati lok sabha election 2024)

दरम्यान यावेळी विजय शिवतारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. शिवतारे म्हणाले की, बारामती लोकसभा मतदार संघ हा कोणाचा सातबारा नाही, देशातील ५४३ पैकी एक मतदारसंघ आहे. येथे मालकी कोणाची नाहीये. म्हणून पवार-पवार करण्याएवजी आपण आपला स्वाभीमान जागा करून लढलं पाहिजे असेही शिवतारे म्हणाले.

विशेषतः अजित पवार, २०१९ च्या निवडणुकीत, मी त्यांच्या मुलाच्या विरोधात प्रचार केला होता तो राजकारणाचा भाग आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता. पण अजित पवारांनी सभ्यतेची नीच पातळी गाठली. मी २३ दिवस लिलावतीमध्ये भरती होतो. मी अॅम्बुलन्समधून सगळा प्रचार केला. त्याला अजित पवारांनी पालखी दौरा असल्याचं सांगितलं. मरायला लागलाय तर कशाला निवडणूक लढवताय.... लोकांच्या सहानुभूतीसाठी तुम्ही खोटं बोलताय... माझ्या गाडीचा नंबर, कोणची-कोणत्या कंपनीची इथंपर्यंत अजित पवार खालच्या थरापर्यंत आले. तु कसा पुढे निवडणून येतो तेच बघतो... महाराष्ट्रात मी कोणाला पाडायचं ठरवलं तर मी कोणाच्या बापाचं ऐकत नाही, मी पाडतो म्हणजे पाडतोच असेही अजित पवार म्हणाले.. राजकारणात एखाद्याला निवडणून आणण्याची प्रवृत्ती असावी... असेही शिवतारे यावेळी म्हणाले.

Vijay Shivtare On contesting Lok Sabha Election 2024 from Baramati
Lok Sabha 2024: लोकसभेपूर्वी काँग्रेसला पुन्हा धक्का बसणार? संजय निरुपम यांनी अशोक चव्हाणांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

अशा प्रकारची उर्मट भाषा त्यांनी केली होती. त्यासाठी मी त्यांना माफ केलं. ते महायुतीत आले तेव्हा मी त्यांचा सत्कार केला, तरी पुढचे सात-आठ महिने त्यांची गुर्मी तशीच होती. कोणाशी नीट बोलत नाहीत.

त्यांच्या उर्मटपणाबद्दल पूर्ण बारामती मतदारसंघात लोक म्हणत आहेत की, आता सुनेत्राताई आणि सुप्रिया सुळे आहेत... पण अजित पवार उर्मट आहेत म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार नाहीत सुप्रीय सुळेंना मतदान करू... त्यावेळी मी ठरवलं की, बारामतीत सहा लाख ८६ हजार मतदान पवारांच्या समर्थनात आहे, पण ५ लाख ५० हजार मतदार पवार विरोधक आहेत. मग त्यांना अशा नाआवडत्या लोकांना मतदान न करण्याची संधी मिळाली नाही तर तो लोकशाहीचा घात होतोय हे लक्षात आल्यानंतर मी निवडणूक लढवण्याचं ठरवलं असेही शिवतारे यावेळी म्हणाले.

Vijay Shivtare On contesting Lok Sabha Election 2024 from Baramati
Rameshwaram Cafe blast case: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी एक संशयित ताब्यात; एनआयएची कारवाई- रिपोर्ट

पुरंदरचे लोक म्हणत आहेत की, आम्हाला बदला घ्यायचा आहे, मी नाही बोलत. नियती बदला घेईल. जेव्हा पवार साहेब (शरद पवार) स्वतः त्यांच्या मुलाबद्दल माझ्या नातवाच्या म्हणण्याला कवडीमोलाची किंमत नाही हे त्या दिवशीच संपलं, तुम्हाला घर सोडून जावं लागलं, पहाटेचा शपतविधी झाला तेव्हांच तुमची विश्वाहार्यता संपली होती असा टोला देखील शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावाला.

बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या आणि घराणेशाहीला न माणणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार असेही शिवतारे यावेळी म्हणाले.

लोकसभा निवडणूकीत एका बाजुला वाघ आहे, एका बाजुला लांडगा आहे. असेच पर्याय सध्या दोन पवारांमुळे मतदारांपुढे आहेत. १९९९ ला अनंतराव थोपटे मुख्यमंत्री झाले असते. त्यांचा पराभव केला. . अजित पवार यांनी संग्राम थोपटे यांना मंत्री होऊ दिले नाही, ⁠हर्षवर्धन पाटील यांची फसवणुक केली. विजय शिवतारे यांना एक मत, म्हणजे दोन्ही पवारांना एकदाच पाडण्याची संधी असेही शिवतारे यावेळी म्हणाले. लोक म्हणतात अजित पवार यांचा पराभव होईल. त्यामुळे आमची लढाई सुप्रिया सुळे यांच्याशी आहे. अजित पवार यांचा आजही माज गेलेला नाही. हा माज उतरावयाचा आहे, असेही शिवतारे यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com