विजय वडेट्टीवारांची नाराजी दूर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 11 जानेवारी 2020

कोल्हापूरचे पालकमंत्रिपद कदम यांच्याकडे?
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद काँग्रेसचे राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांच्याकडे सोपविले जाण्याची शक्‍यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला. राज्यमंत्री सतेज पाटील भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांच्याकडे कोल्हापूरची जबाबदारी द्यावी का, यावर काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे; तर डॉ. पतंगराव कदम यांचे पुत्र विश्‍वजित कदम राज्यमंत्री आहेत. त्यांना कोल्हापूरचे पालकमंत्री करावे का, याबाबतही काँग्रेसमध्ये खलबते सुरू आहेत.

मुंबई - काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची नाराजी अखेर दूर झाली असून त्यांच्याकडे मदत व पुनर्वसन खात्याची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे वडेट्टीवार यांनी आज मंत्रालयात मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात रात्री उशिरा बाळासाहेब थोरात दिल्लीत दाखल झाले. त्यांनी काँग्रेसच्या के. सी. वेणुगोपाल आणि इतर ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर फोनवरुन वडेट्टीवार यांचे पक्षश्रेष्ठींशी बोलणे करुन दिल्यावर वडेट्टीवार यांची नाराजी दूर झाली आहे. शिवसेनेकडे असलेले मदत व पुनर्वसन खाते विजय वडेट्टीवार यांना दिल्यावर त्यांनी पदभारही स्वीकारला. विजय वडेट्टीवार यांना मिळालेल्या खात्यांमध्ये आधी भूकंप पुनर्वसन खाते होते. तर शिवसेनेचे संजय राठोड यांच्याकडे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन हे विभाग होते. आता मदत व पुनर्वसन हे खाते वडेट्टीवार यांच्याकडे असणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijay wadettiwar Offended