राज्याच्या तिजोरीला कोरोनाचा दणका; पगार देण्यासाठीही कर्ज काढायची वेळ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

कोविड-19 विरोधात लढा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारला निधी उपलब्ध करून दिला असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वारंवार केला जात आहे.

पुणे :''कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने राज्य सरकारच्या महसूलाला मोठा फटका बसला आहे. कर्मचाऱ्यांच्या पगार देण्यासाठी कर्ज काढावे लागेल काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असेल तरी कोविड योद्धा जे आहेत, ते वगळता इतर विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे,' अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुणे शहरातील कोरोनाचा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वडेट्टीवार आज पुण्यात आले होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले " कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी राज्य सरकार निधी कमी पडू देणार नाही, असे सांगून वडेट्टीवार म्हणाले," मदत, आरोग्यासह कोविड-19 साठी लढा देत असलेले चार विभाग वगळता अन्य सर्व विभागातील खर्चांना राज्य सरकारने कात्री लावली आहे. परंतु कोविड-19 साठी काम करीत असलेल्या योद्धांच्या पगारात कोणतीही कपात केली जाणार नाही. एक वेळी आयएएस अधिकाऱ्यांच्या पगारात कपात करून परंतु परिचारिका आणि डॉक्‍टरांना मात्र त्याची झळ पोचू देणार नाही.'' 
 
डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश, कोरोना चाचण्यांची संख्या वाढणार

कोविड-19 विरोधात लढा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारला निधी उपलब्ध करून दिला असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वारंवार केला जात आहे. त्याबद्दल विचारले असता वडेट्टीवार म्हणाले,"" केंद्राकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. विरोधक विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijay wadettiwar says that the economic condition of the state is deteriorating due to corona