
मुंबई : ‘राज्यात विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तूर, द्राक्ष, कांदा, भाजीपाला अशा पिकांचे नुकसान झाले आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी कृषिमंत्र्यांची भाषा ही असंवेदनशील असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी केली.