'व्हिलेज रॉकस्टार्स' ऑस्करमधून बाहेर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 डिसेंबर 2018

मुंबई - भारताकडून परदेशी भाषांतील चित्रपटांच्या श्रेणीत पाठवला गेलेला "व्हिलेज रॉकस्टार्स' हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता आसामी चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

मुंबई - भारताकडून परदेशी भाषांतील चित्रपटांच्या श्रेणीत पाठवला गेलेला "व्हिलेज रॉकस्टार्स' हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता आसामी चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

परदेशी भाषांतील चित्रपटाच्या श्रेणीत निवडलेल्या नऊ चित्रपटांची नावे अकॅडमी ऑफ मोशन पिक्‍चर आर्टस ऍण्ड सायन्सने नुकतीच जाहीर केली. या यादीत रिमा दास यांनी दिग्दर्शित केलेल्या "व्हिलेज रॉकस्टार्स'ला स्थान मिळाले नाही. त्यामुळे ऑस्कर मिळवण्याचे भारताचे स्वप्न या वर्षीही साकार झालेले नाही. 91 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी परदेशी भाषांतील चित्रपट श्रेणीत वेगवेगळ्या देशांतून तब्बल 87 चित्रपट आले होते. "सलाम बॉम्बे', "मदर इंडिया' आणि "लगान' या भारतीय चित्रपटांनी या श्रेणीच्या पाचव्या फेरीपर्यंत मजल गाठली होती.

परदेशी भाषा श्रेणीत निवड
बर्डस ऑफ पॅसेज (कोलंबिया), द गिल्टी (डेन्मार्क), नेव्हर लुक अवे (जर्मनी), शॉपलिफ्टर्स (जपान), आयका (कझाकस्तान), कॅपरनाम (लेबनान), रोमा (मेक्‍सिको), कोल्ड वॉर (पोलंड), द बर्निंग (दक्षिण कोरिया).

Web Title: Village Rockstars out in Oscar