Vinayak Mete Death: मेटेंच्या पत्नीची तब्येत बिघडली; उपचार सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vinayak-Mete

Vinayak Mete Death: मेटेंच्या पत्नीची तब्येत बिघडली; उपचार सुरू

शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटे यांचा आज सकाळी अपघातात मृत्यू झाला. अपघातात त्यांना गंभीर इजा झाली होती. त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, त्यांचे कुटुंबीय उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात पोहोचले आहेत. अनेक नेत्यांनीही त्यांची भेट घेतली आहे.

दरम्यान विनायक मेटेंच्या पत्नीची तब्येत बिघडली असल्याची माहिती मिळत आहे. त्यांना सलाईन लावलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मेटेंच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अजित पवारांनी यावेळी त्यांच्या पत्नीच्या भावना माध्यमांसमोर मांडल्या. मेटेंचा फोन कधीही बंद लागत नव्हता, पण अपघाताची बातमी कळल्यावर जेव्हा आपण फोन करायचा प्रयत्न केला, तेव्हा तो बंद लागला, असं म्हणत मेटे यांच्या पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटल्याचं पवारांनी सांगितलं.

Web Title: Vinayak Mete Death By Accident Wife Falls Sick Admitted In Hospital

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :vinayak mete