Viral Video: गोविंदांच्या थरावर चढून शिवाजी महाराजांनी केला अफजलखानाचा वध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral video

Viral Video: गोविंदांच्या थरावर चढून शिवाजी महाराजांनी केला अफजलखानाचा वध

मुंबई : काल गोपाळकाल्यानिमित्ताने राज्यभर आणि देशभर दहिहंडी उत्सव साजरा केला गेला. यामध्ये अनेक पथकांनी हंडी फोडण्याचा पराक्रम केला आहे. यातच अजून एका गोविंदा पथकाचा व्हिडिओ व्हायरल होत असून गोविंदांच्या थरावर जाऊन शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला आहे.

(Dahi Handi Shivaji Maharaj Viral Video)

दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून हा प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. गोविंदांच्या चौथ्या घरावर जात शिवाजी महाराजांचे पात्र साकारणाऱ्या मुलाने अफजलखानाचा वध केला आहे. हा व्हिडिओला सध्या नेटकऱ्यांकडून प्रचंड पसंती मिळत आहे.

अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, "खरी हिंदुत्वाची जाणीव अणि छत्रपति शिवाजी महाराजांबद्दल आदर ह्या नेत्यांमध्ये दिसून येतो ... म्हणून आज हे दृश्य सुद्धा ह्यांच्या समोर गोविंदा पथकांनी मांडले .... हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कोण अडचणीत असेल तर नक्की त्याच्या मागे नितेश राणे साहेब खंबीर पणे आपल्या पाठीशी उभे असतात." असं ट्वीट राणे यांनी केलं आहे.