esakal | राज्यात मतदार दहा लाखांनी वाढले
sakal

बोलून बातमी शोधा

Voters in the state increased by ten lakh

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे दहा लाख मतदारांची वाढ झाली असल्याचे निवडणूक आयोगाची आकडेवारी सांगते.

राज्यात मतदार दहा लाखांनी वाढले

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे दहा लाख मतदारांची वाढ झाली असल्याचे निवडणूक आयोगाची आकडेवारी सांगते. निवडणूक आयोगाने १५ जुलै ते ३१ ऑगस्टदरम्यान मतदार दुरुस्ती याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम राबवला होता. यातून ही माहिती पुढे आली आहे. हा कार्यक्रम येत्या सहा सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

निवडणूक आयोग नियमितपणे मतदार दुरुस्ती याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम हाती घेत असते. यानुसार राबवलेल्या उपक्रमात ऑगस्टअखेर आठ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ इतके पात्र मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेला दहा लाखांपेक्षा जास्त मदारांची संख्या झाली आहे. यात चार कोटी ६७ लाख ३७ हजार ८४१ पुरुष तर चार कोटी २७ लाख पाच हजार ७७७ लाख महिला मतदार आहेत. २५९३ तृतीय पंथी मतदार आहेत. 

मुंबई उपनगरात राज्यात सर्वांत जास्त म्हणजे ५२७, त्यानंतर ठाणे जिल्ह्यात ४६० तर तिसऱ्या क्रमांवर पुणे जिल्ह्यात २२८ असे तृतीय पंथी मतदार आहेत.

७६,८६,६३६ - पुणे जिल्ह्यातील मतदार
७२,२६,८२६ - मुंबई उपनगरांतील  मतदार
६३,२९,३८५ ठाणे जिल्ह्यातील  मतदार

loading image
go to top