
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘ईव्हीएम’ बाबत संशय व्यक्त करतानाच त्यांच्यावर होत असलेल्या कायम भूमिका बदलण्याच्या आरोपाचा खुलासा करीत भाजपचा समाचार घेतला. जनतेने मनसेला मते दिली, मात्र, ही मते पक्षांपर्यंत पोचलीच नाहीत, असे प्रतिपादन करत त्यांनी ‘ईव्हीएम’वर संशय व्यक्त केला.