साताऱ्याची पोटनिवडणूक 21 ऑक्टोबरलाच; उदयनराजेंना आधार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे नोटिफिकेशन आज सकाळी निवडणूक आयोगाकडून काढण्यात आले. विधानसभेसोबत लोकसभेची पोट निवडणूक होणार असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध उदयनराजे असा सामना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी साताऱ्यात सभा घेऊन उदयनराजेंना लक्ष्य केले होते. त्यानंतर येथे जोरदार लढत होणार हे निश्चित आहे.  

नवी दिल्ली : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार हे आज (मंगळवार) स्पष्ट झाले असून, निवडणूक आयोगाकडून याबाबतची आज अधिसूचना काढण्यात आली. विधानसभेसोबत म्हणजेच 21 ऑक्टोबरला साताऱ्यात लोकसभेसाठी मतदान होणार असून, 24 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. यामुळे उदयनराजे भोसले यांना विधानसभेचा आधार मिळाला आहे.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे नोटिफिकेशन आज सकाळी निवडणूक आयोगाकडून काढण्यात आले. विधानसभेसोबत लोकसभेची पोट निवडणूक होणार असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध उदयनराजे असा सामना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी साताऱ्यात सभा घेऊन उदयनराजेंना लक्ष्य केले होते. त्यानंतर येथे जोरदार लढत होणार हे निश्चित आहे.  

विधानसभा निवडणुकांबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होऊन, त्यात विधानसभा निवडणुकीच्या वातावरणाचा लाभ होईल, अशी शक्यता आहे. साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तत्पूर्वी, त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपची कास धरल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीने सातारा पोटनिवडणुकीत तगडा उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे.  

पोटनिवडणुकीसाठी १८ कोटी खर्च? 
एका विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी साधारणत: तीन कोटी रुपयांचा खर्च येतो. सातारा लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या सहा जागांचा समावेश आहे. त्यामुळे सातारा पोटनिवडणुकीसाठी सरासरी १८ कोटी रुपयांचा खर्च येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली होती. चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी सरकारने ९१३ कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voting for loksabha by poll in satara will be held on 24 October