
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आणि बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित वाल्मीक कराड हा राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) मुख्यालयात मंगळवारी (ता. ३१) दुपारी शरण आला. वाल्मीक कराड याची सीआयडी मुख्यालयात चौकशी करण्यात येत आहे.